महामार्गावरील टोल दरात वाढ   

नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गावरील प्रवाशांना आता टोलसाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) देशभरातील टोल दरात ४ ते ५ टक्क्यांनी वाढ केली आहे. ही दरवाढ मंगळवारपासून लागू झाली आहे, असे वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.
 
दरवर्षी १ एप्रिलपासून टोलच्या दरात बदल केला जातो. ते घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दराशी संबंधित असते. देशात राष्ट्रीय महामार्गावर ८५५ टोल नाके आहेत. त्यापैकी, ६७५ सरकारतर्फे चालविले जातात. तर, १८० खासगी कंपनीमार्फत चालविले जातात. राष्ट्रीय महामार्ग शुल्क (दर आणि संकलनाचे निर्धारण) नियम, २००८ नुसार हे दर आकरले जातात. दिल्ली-मेरठ महामार्ग, दिल्ली-जयपूर महामार्गासह अन्य महामार्गावरील प्रवास महागणार आहे. 

Related Articles